
वसई-विरार महानगर पत्रकार संघाची श्रद्धांजली!
वसई, दि. 23(वार्ताहर)
दै महाराष्ट्र बुलंद टाइम्स चे संस्थापक संपादक आणि नवघर माणिकपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक,तथा बांधकाम समिती सभापती अशोक (बाबू ) सोनी यांचे वयाच्या 72 व्या वर्षी आज दीर्घआजाराने निधन झाले. त्यांच्या मागे चेतन आणि राजू अशी दोन मुले सून आणि नातवंन्दे असा परिवार आहे.
अशोक सोनी यांनी वसई तालुक्यात आधी समाजकारण आणि नंतर राजकारणात सक्रिय होऊन, तत्कालीन नवघर माणिकपूर नगरपालिकेत नगरसेवक आणि बांधकाम समिती सभापतिपद भूषविले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारितेत झोकून देऊन, स्वतःचे मराठी दैनिक काढले. तसेच वसई तालुका पत्रकार संघाची स्थापना करून, अनेक नवोदित पत्रकारांना आपल्या दैनिकातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
आज संध्याकाळी चार वाजता दिवानमान स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वसई-विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे, सचिव विजय खेतले, खजिनदार झाकीर मेस्त्री, माजी नगरसेवक राजेंद्र कांबळी व छोटू आनंद आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी वसई-विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांनी बाबुभाई सोनी यांना तमाम पत्रकारांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.
अशोक सोनी यांच्या निधन चे वृत्त समजल्यावर आमदार हितेंद्र ठाकूर , माजी महापौर राजीव पाटील, नारायन मानकर, सभागृह नेता फ्रँक आपटे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.