वार्ताहर – कोरोना ची ओसरती लाट लक्षात घेता रोज हजारोंनी परप्रांतीय पुन्हा रोजगारासाठी महाराष्ट्रात येत आहे. ह्या वर स्थानिक पातळीवर प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा हलगर्जीपणामुळे पुन्हा कोरोनाच संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केंद्र सरकार कडून मिळणारा कोरोना प्रतिबंधित लस साठा अपुरा पडत असताना जर परप्रांतीय विना लस घेता जर महाराष्ट्रात दाखल झाले तर स्थानिक नागरिकांना लस मिळण्यास अडचणीचे ठरू शकते. याकरिता आमची वसई चे रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे की परप्रांतीयांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नका. अपुरे लसीकरण, लस वितरणाचा ताण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पातळीवर योग्य ती खबरदारी घेत परप्रांतीयांच्या महाराष्ट्र प्रवेशवर बंदी आणावी, सीमा बंदी घालण्यात यावी. स्थानिकांना प्राधान्य देत लसीकरण मोहीम जोरदार सुरू ठेवत ९०% लसीकरण स्थानिकांना मिळावे यासाठी आदेश निर्गमित करावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed