

केंद्र सरकारच्या आदेशानुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेने कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाची तयारी केलेली आहे. आज दिनांक १४ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी पालघर, यांचे मार्फत COVISHIELD या लसीचे एकूण ७००० डोस वसई-विरार शहर महानगरपालिकेस उपलब्ध झालेले आहेत. सदरची लस महानगरपालिकेच्या वरुण इंडस्ट्रीज, वालीव, वसई पूर्व या लसीकरण केंद्रात कोल्ड स्टोरेज मध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. शनिवार, दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी को-विन अॅपवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथमतः ही लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी महानगरपालिकेने एकूण १० लसीकरण केंद्र तयार केले असून एका केंद्रावर १०० लाभार्थी असे १० केंद्रावर एका दिवसाला एक हजार लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार आहे. सदरची लस ही सुरक्षित असून अपवादात्मक स्थितीत लसीकरणानंतर दुष्परिणाम झाल्यास उपचाराकरिता AEFI कमिटी स्थापन करण्यात आली असून AEFI Management Centre निश्चीत करण्यात आलेले आहेत.