
महाराष्ट्रातील ऐतिहासिक बारव व पायविहरी याचे संवर्धन व जतन करण्यासाठी जनजागृती
कर्जत : महाराष्ट्रील ऐतिहासिक बारव व पायविहरी याचे संवर्धन व जतन व्हावे या साठी महाशिवरात्री चे औचित्यसाधून संवर्धन करुन दीपोत्सव करण्यात आला.
महाराष्ट्रातील ऐकून 1645 बारव व पायविहिरी असून त्याचे जतन व सर्वधन व्हावे यासाठी लोकसमूहातून रोहन काळे यांच्या नियोजन मोहिमेतून गुगल नोंदी केली आहे. या पैकीच कर्जत येथील खालापूर तालुक्याततील एकूण 16 बारव व पायावहिरिंवर महाशिवरात्रीच्या निमित्ताने रायगड जिल्यातील कर्जत येथे संवर्धन व दीपोत्सव करण्यात आले. या संवर्धन मोहिमेत DR फोर्स महाराष्ट्र या दुर्ग रक्षक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष जयकांत शिक्रे व श्रमजीवी विभाग सामाजिक विभाग प्रमुख श्री जगदीश बरफ यांनी महत्वाची कामगिरी बजावली.
जयकांत शिक्रे यांच्या मतानुसार महाराष्ट्रील सर्व गड किल्याचे ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन झाले तरच ते पुढच्या पिढीला पाहावयास मिळेल. नाहीतर अंदाजे सांगावे लागेल कि या ठिकाणी एक ऐतिहासिक वास्तू होती. त्या साठी संवर्धन व जतन होणे गरजेचे आहे असे आव्हान केले आहे.