पालघर : जयंती पिलाने-

DR फोर्स महाराष्ट्र या दुर्ग रक्षक संस्थेने १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने बेमुदत प्लास्टिक मुक्त मोहिमेचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधून रायगडावर संपूर्ण रायगड प्लास्टिक मुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व दुर्ग सेवा संस्थाना या मोहिमेत सहभागी होण्याचे आव्हान केले असून रायगडावर नियोजनबद्ध ठरलेल्या जागी प्लास्टिक गोळा करण्यात येणार आहे व तो कचरा गडाच्या पायथ्याशी आणून योग्य विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
ज्या हिरोजीं इंदुलकरांनी आपले संपूर्ण अस्तित्व पणाला लावून रायगड किल्ला उभारण्याचे कार्य केले. त्याच्या रक्षणासाठी हजारो मावळ्यांनी आपल्या घामाचा आणि रक्ताचा अभिषेक केला. तसेच ज्या राजानी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण व शेवटचा श्वास आणि आपला देह ज्या ठिकाणी ठेवला त्यांचे ऋण फेडण्याचे काम सर्वांनी हाती घेऊन एक मोलाचे कार्य करावे. गडावर गेले असता अनेक जण पाणी बॉटल किंवा सुका खाऊ घेऊन जात असतो. मात्र खाऊचा कचरा गडावरच टाकून तेथे घाण केली जाते.त्यामुळे गडावर सर्वत्र प्लास्टिक बॉटल व कचऱ्याचे ढिगारे दिसतात हे पाहून खूप खंत वाटते. चला एकत्र येऊन या किल्यांना प्लास्टिक मुक्त करू, अवघे अवघे यावे,, गडकिल्ले स्वच्छ व सुंदर करुनी सोडावे.
मोहिमेचे नियोजन सूचना-
१) गडावर योग्य जागा पाहणी करून जिथे जास्त प्लास्टिक व कचरा आहे ते रेड झोन म्हणून निवडले गेले आहेत.
२) मोहिमेला येणाऱ्या प्रत्येकाला जे ठिकाण देण्यात येईल त्या ठिकाणी कार्य करण्यात येईल.
३) या मोहिमेत अजून नवीन २ विशेष संवर्धन उपक्रम हाती घेतले आहेत याची माहिती मोहिमेच्या दिवशी दिली जाईल.
४) मोहीम एक दिवस नसून बेमुदत असेल ,जोपर्यंत गडावरील शेवटचा प्लास्टिक खाली येत नाही तोपर्यंत मोहीम चालू राहील.
त्याचप्रमाणे या मोहिमेसाठी स्वतःहून मदत कार्य करायचे असेल त्यांनी खाली दिलेल्या वस्तूंची मदत करण्यात यावी. १) खराटा झाडू १०(१नग १२० रुपये)
२) मोहिमेतील अन्नदान
३) १००/१०० मीटर ४/रोप,
४) मेडिसिन ( मेडीकल किट १०)
५) हातातील जाड ग्लोस १०० नग
६) स्यानिटायजर व ,,मास ( १०००)
७) कचरा जमा करायच्या मोठ्या
पिशव्या १०००+अधिक
८) माहिती व सूचना फलक
९) इतर काही महत्वाचे उपक्रम साहित्य
१०) मेटल पाणी बॉटल( १००)
यापैकी कोणतीही वस्तु संवर्धन कार्याला प्रत्यक्ष देऊन किंवा आर्थिक स्वरूपची मदत करू शकता.या मोहिमेसाठी सर्वांच्या सहकार्याने खूप
मोठा इतिहास जपला जाईल. मोहिमेत सहभागी होण्यासाठी खालील नंबरवरून संपर्क करावा. ७७६७८७६५६२. असे आव्हान DR फोर्स चे संस्थापक जयकांत शिंक्रे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *