

अकोला प्रतिनिधी सोमवार दि.०६ जाने २०२० रोजी विद्यार्थी संघर्ष कृती समिती अकोला च्या वतीने अकोला जिल्हाधिकारी साहेब यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली (JNU) येथे दि.०५ जाने २०२० रोजी रात्री चेहरे झाकलेली काट्या धरी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक जखमी झाले . तसेच विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष “आयेशी घोष” गंभीर झाले आहे.या प्रकरणाचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो.या सर्व प्रकरणामध्ये कोण जबाबदार आहे याची लवकरात लवकर चौकशी करून हल्लेखोरांना ताबडतोब अटक करावी, ही मागणी घेऊन निवेदन सादर करण्यात आले.यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला जिल्हाध्यक्ष रोहित वानखडे, प्रहार अकोला तालुकाध्यक्ष बॉबी पळसपगार,सम्यक विद्यार्थी नेते आकाश गवई, आरपीआय अकोला महानगराउपाध्यक्ष राजकुमार शिरसाट, सुशील कांबळे,अभिजित अवचार, गौरव मेश्राम, भूषण शिरसाट, सागर निर्मळ, प्रशिक भालेराव, प्रशांत गवई, निखिल शिंदे, अभिषेक, भूषण खंडारे, देवा थाटे, संकेत कांबळे ,आकाश
जवंजळ, अक्षय वानखडे आदी उपस्थित होते.