गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे *अध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक* यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) *महानगर आयुक्त श्री एस श्रीनिवास* यांना पत्राद्वारे कशिद-कोपर गावातील डोंगरावर चालू असलेल्या धोकादायक पाण्याच्या टाकीचे काम त्वरित थांबविण्यात यावे आणि धोकादायक बनविलेला डोंगर योग्य रितीने दुरुस्त करा आणि पाण्याची टाकी दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी बांधण्यात यावी अन्यथा पुन्हा आंदोलन चालू केले जाईल अशी सूचना दिली.
तसेच आमच्या गावाला माळीण व तळई गावांसारखी परिस्थिती बनवू नका म्हणून "गाव वाचवा संघर्ष समिती, कशिद-कोपर" च्या माध्यमातून सातत्याने MMRDA च्या प्रशासनाला कळवूनही आमच्या सुचनेकडे दुर्लक्ष केले, संपूर्ण गावाला धोक्यात टाकले आणि अद्ययावत तंत्रज्ञान असूनही डोंगर कोसळलेला आहे. म्हणून संबंधित MMRDA च्या दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी म्हणून *मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त सन्मा. सदानंद दाते (IPS)* यांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिलेले आहे.
यावेळी श्री समीर सुभाष वर्तक यांच्यासोबत "गाव वाचवा संघर्ष समिती, कशिद-कोपरचे" श्री अनिल कुडू, वासुदेव किणी आणि वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री डेरीक फूर्ट्याडो उपस्थित होते.