

वसई-विरार : युवाशक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला यांनी म्हटले आहे की, लवकरच पत्रकार परिषद घेऊन वसई-विरार महानगरपालिकेच्या (VVCMC) घनकचरा ठेक्यातील प्रचंड भ्रष्टाचाराचे धक्कादायक पुरावे जाहीर करण्यात येणार आहेत.
🔴 मुख्य घोटाळ्याचा मुद्दा :
महापालिकेच्या सर्व 09 विभाग व 20 झोनमधील घनकचरा ठेका हा फक्त मजुरांचा ठेका असूनही मजुरांची संख्या मुद्दाम कमी ठेवून मुकादम व वाहनचालक भरले गेले आहेत. हे मुकादम प्रत्यक्षात ठेकेदारांचे ऑफिस स्टाफ, नातेवाईक व मित्रमंडळी असून त्यांचे मुख्य काम म्हणजे ठेकेदार, आरोग्य निरीक्षक व महापालिका अधिकाऱ्यांचे एजंट म्हणून काम करणे?
🔴 ATM कार्ड घोटाळा :
प्रत्येक मुकादमाकडे मजुरांची 20 ते 25 बँक एटीएम कार्डे असून, बनावट हजेरी लावून ठेकेदारांकडून पूर्ण बिल काढले जाते. मजुरांचा पगार त्यांच्या खात्यात भरला जातो; परंतु मुकादम हे एटीएम कार्ड वापरून तो पगार काढून ठेकेदारांना परत करतात. प्रत्यक्षात मजुरांना फक्त त्यांनी केलेल्या दिवसांचेच पैसे दिले जातात.
🔴 भ्रष्टाचाराची चेन ?
या मोठ्या घोटाळ्यात ठेकेदार, आरोग्य निरीक्षक व VVCMCचे वरिष्ठ अधिकारी थेट सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे युवाशक्ती एक्सप्रेस कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला यांनी स्पष्ट केले. हे मुकादम म्हणजे त्यांच्या भ्रष्टाचाराचे एजंट असून काहींनी या घोटाळ्यातून कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. एवढेच नव्हे तर असे अनेक मुकादम आगामी निवडणुकीत प्रसिद्ध पक्षांच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत.
त्यामुळे आता जनतेपुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे की —
“सदर पक्ष असे भ्रष्ट मुकादमांना खरोखरच उमेदवारी देणार का?”
एक धक्कादायक प्रकरण :
यातीलच एका मुकादमाचे उमेलमान, बरंमपूर हनुमान नगर येथे ऑफिस असून त्या ऑफिसच्या समोरील VVCMCच्या गटारावर त्याने टपरी टाकली आहे आणि त्याचे भाडे तो घेत आहे. यासाठी महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे का, हा मोठा प्रश्न उभा राहतो.
🔴 पुरावे व निष्क्रियता :
या घोटाळ्याचे असंख्य फोटो, व्हिडिओ व कागदपत्री पुरावे युवाशक्ती एक्सप्रेसकडे आहेत. हे सर्व पुरावे वारंवार माननीय महापालिका आयुक्त, उपायुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सादर करूनदेखील आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही. ही बाब लोकशाहीसाठी अतिशय लज्जास्पद असल्याचे युवाशक्ती एक्सप्रेस कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला यांनी म्हटले आहे.
🔴 युवाशक्ती एक्सप्रेसची भूमिका :
युवाशक्ती एक्सप्रेस कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत माननीय आयुक्त, उपायुक्त व अतिरिक्त आयुक्त भ्रष्ट ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करून कठोर कारवाई करत नाहीत, तोपर्यंत युवाशक्ती एक्सप्रेस पुरावे देत राहील आणि तक्रारी करत राहील.
“एक दिवस असा येईल की महापालिका अधिकारीही जनतेसमोर लाजेने तरी आपले कर्तव्य बजावतील,” असे रुबिना मुल्ला यांचे म्हणणे आहे.
ही पत्रकार परिषद लवकरच घेण्यात येणार असून त्यात घोटाळ्याचे फोटो, व्हिडिओ व संपूर्ण पुरावे सार्वजनिक केले जातील.
