पोलिसांना आपल्या खासगी गाडीवर ‘पोलीस’ अशी पाटी लावता येणार नाही.

मुंबई, 26 जून : मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना आपल्या खासगी गाडीवर ‘पोलीस’ अशी पाटी लावता येणार नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अशी पाटी लावलेल्या गाडीवर यापुढे कारवाई केली जाणार आहे.

अनेक पोलिसांच्या खासगी गाडीवर ‘पोलीस’ अशी पाटी लावलेली असते. मात्र अनेकदा याचा वापर कारवाईपासून वाचण्यासाठी केला जातो. आता यापुढे गाडीवर मुंबई पोलीस किंवा वाहतूक पोलिसांचा लोगो लावता येणार नाही. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 2013 च्या कलम 134 प्रमाणे यावर कारवाई करण्यात येणार आहे.

हायकोर्टाच्या आदेशानंतर वाहतूक पोलिसांना येत्या 7 दिवसात कुणावर कारवाई केली याचा अहवाल वाहतूक मुख्यालयाला सादर करायचा आहे. त्यामुळे येत्या काही काळात अशी कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस सक्रिय झाल्याचं पाहायला मिळेल.

न्यायाधीशांसाठीही नियम

न्यायाधीशांनाही आपल्या खासगी वाहनांवर ‘न्यायाधीश. असं लिहिता येणार नाही. याबाबत मुंबई हायकोर्टाने परिपत्रक काढलं आहे.

दरम्यान, अनेक पोलिसांच्या खासगी वाहनांवर नावाचा आणि पोलिसांच्या लोगोचा उल्लेख असतो. याचा वापर करून काही जनांकडून नियमांची पायमल्ली केली जाते. असे प्रकार रोखण्यासाठी हायकोर्टाने हा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed