लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांना स्त्री दर्पण चे मासिक देताना छायाचित्रात स्त्री दर्पणचे मुख्य संपादिका तेहसीन चिंचोळकर (पठाण) सह संपादक विभावरी देसाई आणि युनिटी मीडिया प्रेस क्लब चे अध्यक्षा व युवाशक्ती एक्सप्रेस च्या कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला दिसत आहे.
वसई, प्रतिनिधी : हिंदी मासिक “स्त्री दर्पण” दिवाळी विशेषांक २०२१ च्या पहिल्या अंकाचा प्रकाशन कार्यक्रम वसई-विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महिला महापौर सौ. प्रविणाताईंच्या विरार येथील कार्यालयात त्यांच्या शुभ हस्ते प्रकाशित करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात मासिकाच्या मुख्य संपादक तहेसीन चिंचोलकर, मासिकाच्या सहसंपादिका विभावरी देसाई, साप्ताहिक युवाशक्ती एक्सप्रेसचे कार्यकारी संपादक सौ. रुबिना मुल्ला, मासिकाच्या सदस्या सौ. वैद्य, प्रणाली, उपस्थित होते. स्त्री दर्पणच्या संपादकाने प्रविणाजींना दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांच्याशी संवाद ही साधला त्यावेळी ताईंनी स्त्री दर्पणच्या माध्यमातून महिलांच्या विविध पैलूंवर आपले वचार मांडले. प्रविणजींनी आपल्या विचारशैलीत स्त्री दर्पणला सहकार्य करताना संपूर्ण टीम व महिला वर्गाच्या जागृती व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. तसेच बहुजन विकास आघाडी चे मा. लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूरजी व पक्षाचे संघटक मा. आजीव नाना पाटील यांची ही कार्यालयात भेट घेऊन त्यांना स्त्री दर्पण चे अंक दिले. यावेळी लोकनेते व आजीव नाना पाटील यांनी स्त्री दर्पण च्या संपूर्ण टीमला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
बविआ पक्षाचे संघटक मा.अजीवजी पाटील ( मा.नगरसेवक ) यांना स्त्री दर्पण मासिकचे अंक देताना स्त्री दर्पणचे संपादिका तेहसीन चिंचोळकर छायाचित्रात दिसत आहे.
आणि स्त्री दर्पण चे सह संपादक विभावरी देसाई वारली चित्र प्रथम महिला महापौर प्रविणाजी ठाकूर यांना भेट देताना सोबत संपादिका तेहसीन चिंचोळकर (पठाण) छायाचित्रात दिसत आहे.
महिला महापौर प्रविणाजी ठाकूर यांच्या हस्ते स्त्री दर्पण मासिकचे लोकार्पण करण्यात आले सोबत मुख्य संपादक तेहसीन चिंचोळकर, सह संपादक विभावरी देसाई सौ. वैद्य , प्रणाली कदम तसेच युनिटी मीडिया प्रेस क्लबच्या अध्यक्ष व युवाशक्ती एक्सप्रेस चे कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला छायाचित्रात दिसत आहे.सौ.वैद्य यांच्या कडून प्रथम महिला महापौर प्रविणाजी ठाकूर यांना भेट देताना छायाचित्रात स्त्री दर्पण मासिकचे मुख्य संपादक तेहसीन चिंचोळकर (पठाण)प्रथममहिला महापौर प्रविणाजी ठाकूर यांच्या सोबत युनिटी मीडिया प्रेस क्लब च्या अध्यक्ष आणि युवाशक्ती एक्सप्रेस च्या कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला छायाचित्रात दिसत आहे
प्रथममहिला महापौर प्रविणाजी ठाकूर यांच्या सोबत ज्युपिटर पब्लिकेशनचे (MD) व स्त्री दर्पणचे मुख्य संपादिका तेहसीन चिंचोळकर(पठाण)छायाचित्रात दिसत आहे.