
EDच्या छायेत अडकलेल्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी पत्रकारांना दिल्या जात आहेत खास पार्ट्या – लेखनासाठी ‘पुरस्कार’?
प्रतिनिधी | वसई-विरार
वसई-विरार महानगरपालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणांवर ईडीसह इतर तपास यंत्रणांची करडी नजर असताना, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी सुरू झालेला ‘पार्टी प्लॅन’ आता भ्रष्टाचाराच्या नव्या खेळाची घंटा वाजवत आहे.
महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी गंभीर चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले असून, त्यांना वाचवण्यासाठी आता ‘मिठी पत्रकारिता’ची फौज पुढे सरसावली आहे. काही ‘विशेष पत्रकारांना’ खास पार्टी दिल्या जात आहेत, आणि त्यामध्ये लेखनाच्या मोबदल्यात ‘पुरस्कार’, ‘सुविधा’ आणि ‘प्रतिष्ठा’चा गाजर दाखवला जात आहे, अशी माहिती विश्वासार्ह सूत्रांद्वारे मिळाली आहे.
विशेष म्हणजे, सदर ‘पत्रकार’ हे बहुतांश करून ‘मीरा-भाईंदर’ येथून बोलावले गेले होते, असेही समजते. लवकरच या ‘पार्टी प्लॅन’मागील संपूर्ण हकीकत, पुराव्यांसह उघडकीस आणली जाणार आहे.
