

नालासोपारा(प्रतिनिधी)- सोमवार दि. १३ डिसेंबर २०२१ रोजी मनपाच्या तुळींज येथिल रुग्णालयात भरती होण्यासाठी गेले असता रुग्णाचे नातेवाईक यांनी रिपाई युवा जिल्हाध्यक्ष एस.रहमान शेख यांच्याशी संपर्क केले असता त्यांनी आपली परिस्थिती सांगितले की गेल्या 10 डिसेंबर ला वजन1 किलो 100 ग्राम चा नवजात शिशु चा जन्म झाला. त्याची स्वास्थ ठीक नसल्याने तेथील डॉक्टरांनी एनआयसुमध्ये दाखल करा असे सांगण्यात आले, मात्र रुग्णाची परिवाराची हालत हालाखालीची होती त्यामुळे त्यांनी आपले पत्रकार मित्र मुकेश त्रिपाठी यांना कॉल केला त्यांनी मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कविता यांना संपूर्ण रुग्णाचे पारिस्थिती सांगण्यात आली आणि तात्काळ त्या लहान मूल ला एनआयसु मध्ये भरती करण्यात आली तसेच रुग्णाचे परिवाराने रिपाई युवा जिल्हाध्यक्ष एस.रहमान शेख आणि पत्रकार मुकेश त्रिपाठी यांना मदत केल्याबद्दल त्यांना मनापासुन आभार मानले.