पालघर (प्रतिनिधी) – पालघरकरांचा वीज प्रश्न निकाली काढण्यासाठी 50 कोटीची मागणी 130 पालघर (अ. ज.) विधानसभा आमदार राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यावेळी आमदार गावित म्हणाले की, पालघर तालुक्यातील वीज प्रश्न गंभीर होत चालला असून येथील लोकांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा व्हावा म्हणून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा याअनुषंगाने आम्ही दि. 03 फेब्रुवारी 2025 रोजी महावितरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली असता सातपाटी, केळवे, वरोर, वासगाव, ओशिवारा, पेठ केळवोड, बंदाठे, बांगर्जे, मुरबाड, पडघे, हालोली, धानिवरी, तारापूर अशा विविध गावातील ग्रामस्थ आपले अडचणीचे निवेदन घेऊन या बैठकीस उपस्थित होते त्यादरम्यान आम्ही तात्काळ कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन निहाय कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

परंतु, या बैठकीत महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून उक्त सर्व प्रश्न निकाली काढण्याच्या अनुषंगाने साधारण 50 कोटी रुपयांचा प्रस्तावित असणे आवश्यक असल्याचे निकष निघाला होता त्यानिमित्ताने आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पालघरकरांच्यावतीने एक निवेदन दिले असता त्यावर त्यांनी 50 कोटी रुपयांचा निधीला तात्विक मान्य दिली असून लवकरच पालघर तालुक्यातील वीज प्रश्न निकाली निघणार असून यात विजेचे खांब, ट्रांसफार्मर, विद्युत तारा आदी वीज पुरवठा साहित्य मिळणार असून यातून पालघर मध्ये होणारा विजेचा लपंडाव कायमस्वरूपी बंद होईल आणि लोकांना सुरळीत वीज पुरवठा होईल अशी आशा आमदार राजेंद्र गावित व्यक्त केली आहे.

याप्रसंगी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 कोटी रुपयांची तात्विक मान्यता दिल्याने महायुतीचे पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी आभार मानले असून यावेळी स्वरा युवा ग्रुपचे अध्यक्ष तुषार संखे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *