
वसई दि. २१/०३/२०२२, मागील वर्षी मे महिन्यात वसई तालुक्यात तौकते वादळामुळे शेकडो घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाने नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करून अपादग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली होती व त्यानुसार महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पात्र कुटुंबाच्या याद्या बनविण्यात आल्यात. मात्र बहुजन समाज पार्टी कडून प्रतेक्षपणे निरीक्षण केले असता शेकडो पात्र व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. या बाबी विरोधात तहसीलदार वसई, श्रीमती उज्वला भगत यांच्या विरोधात बहुजन समाज पार्टी कडून उग्र आंदोलन दि. २२/०३/२०२२ रोजी तहसीलदार कार्यालयावर होणार होते, मात्र तहसील कार्यालयाकडून कार्यवाहीला सुरुवात होऊन काही लोकांच्या खात्यात रक्कमा जमा करण्याचे काम सुरु केलेले आहे परंतु अद्याप पात्र व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही त्यामुळे आणखी १५ दिवसांचा कालावधी देऊन प्रशासनास सहकार्य करण्याच्या हेतूने तूर्तास मंगळवार दि. २२/०३/२०२२ रोजी वसई तहसील कार्यालया समोर होणारे आंदोलन स्थगित करीत असल्याचे बहुजन समाज पार्टी चे पालघर जिल्हा प्रभारी प्रा. डी. एन. खरे यांनी सांगितले.
मात्र उर्वरित सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात योग्य ती कार्यवाही करून रक्कमा तात्काळ वळत्या कराव्यात अन्यथा १५ दिवसा नंतर बहुजन समाज पार्टी कडून कधीही जन आंदोलन करणार असल्याचा इशारा बसपा कडून देण्यात आला.

