मुंबई :- मिठ चौकी लिंक रोड मालाड (प) मुंबई येथील उड्डाणपूल ( ब्रीज ) नागरिकांसाठी लवकरात लवकर वाहतुकीस खुला करण्यात यावा.
मालाड मालवणी येथील वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे. तरी सदर पुलाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे, तरी काही काम उरलेले असल्यास मुंबई महानगर पालिकेने त्वरित पूर्ण करावे.
तसेच सदर उड्डाणपूलास विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी रिपाई मालाड अध्यक्ष सुनिल गमरे व तमाम भीम अनुयायी व आंबेडकर चळवळीतील सर्व संघटनांची मागणी आहे.ज्याचे निवेदन सहाय्यक आयुक्त पी/उत्तर विभाग किरण दिघावकर यांच्याकडे बौ.पं. स. गट क्र.२९ चे विश्वस्त व रिपाई चे मालाड तालुका अध्यक्ष व इतरही भीम संघटनेच्या पदाधिकारी यांनी दिले आहे.त्या वेळेस शंकर वाकळे,जितेंद्र जोगी,गणेश सोनवणे,महेश कांबळे,स्वप्नील गमरे ,वसंत कांबळे,सिद्धार्थ सावंत,कुंडलिक डोके,सुनील मगर ईत्यादी शिष्टमंडळ भेटले. सदर मागणीचा विचार करून पुढील कार्यवाही सुरू करून नाव देण्याची मागणी पूर्ण करू अशी आश्वासन पी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त मान. किरण दिघावकर यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *