
मुंबई (प्रतिनिधी)

आज दिनांक 21.09.2024 रोजी सायं. 4 वा. निर्धार महाराष्ट्र संघटने तर्फे यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई येथे जन सभा आयोजित केली होती सभेला जमू काश्मीर चेक राज्यपाल सत्यपाल मलिक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती त्याच बरोबर शिवसेनेचे नेते संजय राऊत व खासदार अरविंद सावंत, तुषार गांधी, विद्या चव्हाण, समजवादी चे नेते अबू अझमी, काँग्रेस चे हुसेन दलवाई, किसान नेता डॉ सुनीलम, उल्का ताई महाजन फिरोज मिठबोरवाला, ओबीसी नेते संतोष आंबेकर,काँग्रेस नेते किशोर केदार, दिनेश राणे राष्ट्रवादी मुंबई महिला अध्यक्ष जाधव व स्थानिक लोकाधिकार समिती चे प्रदीप मयेकर आदी उपस्थित होते. सत्यपाल मलिक ने पुलवामा हल्ल्या विषयी कशी बेपरवाई झाली ह्याचे सविस्तर विश्लेषण सांगितले एवढ्या कडक बंदोबस्त असताना हा आतंकी हल्ल्या झाला त्याबद्दल वाईट वाटते. मला महाराष्ट्रच्या जनतेवर विश्वास आहे ते ह्या निर्दयी सरकार ला सत्तेवरून खाली खेचतील. महाराष्ट्र वीरोंका प्रदेश है. सभेला मोठया प्रमाणात गर्दी झाली होती बरंच श्रोते सभागृहात उभे होते. संजय राऊत ने सत्यपाल मलिक निडर नेते आहेत त्यांनी पुलवामा चे सत्य लोकांना सांगितले. शिवसेनेचे लोकं गद्दारांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय गप्प बसणार नाही. महाविकास आघाडीचेच सरकार येणार असा विश्वास आम्हाला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुड्डी ने केले.