


भगवान बुद्धाच्या तसेच सम्राट अशोक यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अश्या नालासोपारा शहरात “परिवर्तन लढा ग्रुप “च्या वतीने याही वर्षी दिनांक 13एप्रिल 2019 ला सम्राट अशोक यांच्या 2323 वी जयंतीच आयोजन करण्यात आलं होतं. जगाचा विश्वसम्राट राजा सम्राट अशोक विसस्मुर्तीत गेला असताना परिवर्तन लढा ग्रुप मात्र हा विश्व सम्राट राजा घराघरात पोचण्यासाठी दरवर्षी जयंतीच आयोजन करीत असतो त्याचा असणारा हा उद्देश आज खऱ्या अर्थाने सफल होताना दिसत आहे. परिवर्तन लढा ग्रुप ने जयंतीच्या मांडलेल्या संकल्पनेस आज मोठं स्वरूप प्राप्त होतं आहे अनेक संघटना परिवर्तन लढा चा आदर्श घेऊन वसई विरार मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विस्मुतीत गेलेल्या राजाची जयंती जल्लोष पूर्ण वातावरणात साजरी करीत आहेत परिवर्तन लढ्याने मांडलेल्या सम्राट अशोक जयंतीचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे . दिनांक 13एप्रिल ला नालासोपारा( पूर्व ) राजनगर येथे परिवर्तन लढा ग्रुपच्या वतीने सम्राट अशोक जयंती अतिशय जल्लोष पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात पवित्र प्राचीन बौध्द स्तूप इथून भव्य बाईक रॅली काढण्यात आली तर दुसऱ्या सत्रात एल्गार सांस्कृतिक मंच यांचा सामाजिक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुख्य जाहीर सभेला प्रमुख वक्ते *मा. राजरत्न आंबेडकर साहेब*, तसेच सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रसिद्ध वकील मा. अमित कटारनवरे साहेब, आशिष इंगळे साहेब, शशिकांत बनसोडे साहेब व युवा उदयोजक मा. दिनेश धबाले साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा झुंझार नेतृत्व, परिवर्तन लढ्याचे संस्थापक मा. सुशांत पवार साहेब होते सदर कार्यक्रमास मोठया प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. सारीपुत्र सावंत आणि बीनेश वाजे यांनी केले .
Nice sushant sir