पालघर दि 15 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तालुका मोखाडा जिल्हा पालघर येथील मध्य वैतरणा धरणाच्या पाण्याची पातळी २७७.५३ मि. टिएचडी इतकी असून धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण पाहता लवकरच मध्य वैतरणा धरणाचे दरवाजे उघडण्याची (Overflow) शक्यता आहे. मध्य वैतरणा धरण ओसंडून वाहण्याची (Overflow) पातळी २८५ मि. टिएचडी इतकी आहे. परंतु सुरक्षेचा उपाय म्हणून २८३.५० मी इतक्या पातळीला धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उर्ध्व वैतरणा धरणातून सोडलेले अतिरीक्त पाणी सुद्धा मध्य वैतरणा धरणात येते. मध्य वैतरणा धरणातून सोडलेले पाणी वैतरणा नदी मार्गे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मोडक सागर धरणात जाते. सदर सोडलेल्या पाण्यामुळे वैतरणा नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे. सोबत पालघर जिल्ह्यात वैतरणा नदीच्या जवळच्या गावांची यादी जोडली आहे.

तरी, मध्य वैतरणा धरणाजवळील व नदीच्या आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना व सर्व संबंधित अधिका-यांना याबाबत सावध राहण्यासाठी आवश्यक ते निर्देश जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *