जिल्हाधिकाऱ्यांचे उप विभागीय अधिकाऱ्यांना पत्र ;दहावी प्रमाणपत्राबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश !

नायब तहसीलदार प्रदीप मुकणे

प्रतिनिधी : वसई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांची विभागीय चौकशी चालू असून पत्रकार श्री अनिल शिवाजी भोवड यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी पालघर यांनी उप विभागिय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रदीप मुकणे यांनी नोकरी मिळविताना शासनास सादर केलेल्या दहावी प्रमाणपत्राबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, सध्या वसई तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत प्रदीप दामोदर मुकणे यांनी महसूल विभागात शासनाची नोकरी मिळविताना दहावी उत्तीर्ण असे प्रमाणपत्र शासनास सादर केले आहे. गोखले एज्युकेशन सोसायटी या शाळेतून दहावी उत्तीर्ण झाल्याचे त्यांनी शासनास सादर केलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात नमूद आहे. दि. २४/६/१९८५ रोजीच्या रजिस्टर नंबर ४६३८ या दाखल्यात एसएससी अनुत्तीर्ण झाला अशा उल्लेख आहे तर दुसऱ्या दाखल्यात s s c passed अशा उल्लेख आहे. रजिस्टर नंबर ४६३८ दि. २४/६/१९८५ च्या संदर्भानेच सदर दाखला ही देण्यात आला आहे.
सदर प्रकरणी मनोहर किशोरीलाल गुप्ता यांनी ७/१/२०१९ रोजी मुख्यमंत्री व तमाम संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविलेल्या तक्रारी प्रकरणी उज्वला भगत तत्कालीन तहसीलदार (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांनी मनोहर किशोरीलाल गुप्ता यांना एक पत्र दिले की, प्रदीप दामोदर मुकणे यांच्या तक्रारीशी त्यांचा काही संबंध नसून सदर बाबत एका शासन परिपत्रकाचा संदर्भ देत त्यांची तक्रार निकाली काढली. सदर प्रकरण पत्रकार अनिल भोवड यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी सदर प्रकरणी चौकशी लावली. जिल्हाधिकारी पालघर यांनी या संदर्भात उप विभागिय अधिकाऱ्यांना पत्र देऊन सदर प्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. प्रदीप दामोदर मुकणे यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे अनिल भोवड यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *