
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक दिवसांपासून वसई – निर्मळ – आगाशी हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता खड्डेमय होऊन सातत्याने अपघात होत आहेत म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री ठाकरे यांना अनेक दिवसांपासून सूचना देऊनही खड्डे बुजविले जात नव्हते म्हणून आज प्रत्यक्ष सार्वजनिक बांधकाम विभागात जाऊन त्वरित खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करा तसेच या खड्ड्यांमुळे अपघातग्रस्त झालेल्यांना नुकसान भरपाई मिळावी अन्यथा आंदोलन केले जाईल म्हणून लेखी पत्र देण्यात आले.
उपअभियंता श्री ठाकरे यांनी आजपासून रस्ता दुरुस्तीचे काम ताबडतोब चालू केलेले आहे.
यावेळी श्री समीर वर्तक यांच्यासोबत महाराष्ट्र काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस व वाघोलीचे माजी सरपंच श्री टोनी डाबरे, प्रदेश सरचिटणीस श्री अभिजित घाग, वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री डेरीक फूर्ट्याडो आणि सामाजिक कार्यकर्ते श्री दर्शन राऊत उपस्थित होते.

