

नालासोपारा (प्रतिनिधी ): दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी नालासोपारा पश्चिम येथील राष्ट्रवादी च्या कार्यलय मध्ये राष्ट्रवादी कामगार युनियचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश भारती यांची उपस्थिती मध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी शिवाजी सुळे आणि वसई विरार शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी अनिता सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्ती पत्र देताना सोबत पालघर जिल्हाध्यक्ष ठाकूर आर्यन सिंह, वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष हरेश कोटकर इतर कार्यकर्ते उपस्थित होते, प्रदेश अध्यक्ष रमेश भारती यांनी कामगारांच्या हित आणि न्याय देण्यासाठी आपली राष्ट्रवादी कामगार युनियन आहे, कामगारांवर अन्याय व अत्याचार झाल्यास त्यांच्या साठी वेळ लागली तर आंदोलन उभे करू देशात कामगाराच्या हिताचे कायदे वर सरकार गदा आणत आहे त्यामुळे आपणाला पक्ष आणि संघटना बाजूला ठेवून कामगारांच्या न्यायसाठी आपणाला एकत्र येण्याचे गरज आहे त्यामुले जास्तीत जास्त सदस्य नोंदणी सुरु करा तळागाळात कामगारांसाठी काम सुरु करा असे पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले, महाराष्ट्रचे उपाध्यक्ष शिवाजी सुळे यांनी प्रदेश अध्यक्ष यांचे प्रथम अभिवादन केले आणि कार्यकर्ता यांना आश्वासन दिले कि मी नेहमी कामगारच्या हितासाठी मी कटीबद्ध राहील यांची ग्वाही सर्वसमोर दिले सोबत पालघर जिल्हाध्यक्ष ठाकूर आर्यन सिंह आणि वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष यांनी सर्व मान्यवरचे स्वागत आणी कार्यकर्ते यांना चहा पानाचा कार्यक्रम करण्यात ठेवण्यात आले आणि नवनिर्वाचित पदाधिकारी यांना भविष्याच्या वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.