भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डी. एन. खरे यांचा आरोप.

विरार दि. १८/०३/२०२५, वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती “एफ” मौजे- मांडवी येथील तलाव सुशोभीकरण करणे. या कामाचा ठेका मे. श्री. सदगुरु कन्स्ट्रक्शन चे मालक श्री. सतीश पुरुषोत्तम पाटील यांना देण्यात आलेला आहे. सदरच्या कामासाठी अंदाजपत्रकीय रक्कम रु. १,३३,२८,२१५/- (एक करोड तेहतीस लाख अठ्ठावीस हजार दोनशे पंधरा) रुपये मंजूर करण्यात आलेली असुन कामाचा कार्यादेश दि. २६/०४/२०२३ रोजी देण्यात आला होता व सदरचे काम पुर्ण करण्यासाठी १८ महिने मुदत देण्यात आलेली होती. त्यानुसार सदरचे काम दि. २६/१०/२०२४ रोजी पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते परंतु अद्याप पर्यंत सदरचे काम पूर्ण झालेले नाही. असे असताना उपअभियंता सतीश कुमार सूर्यवंशी हे ठेकेदाराची बाजू घेऊन भ्रष्टाचाराला खतपाणी देत आहेत. महत्वाची बाब अशी की, सदर कामाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची अडचण नसतांना सुद्धा ठेकेदाराच्या अकार्यक्षमते मुळे काम रखडलेले आहे. परंतु ठेकेदाराला बिल अदा करण्यासाठी उपअभियंता सतीशकुमार सूर्यवंशी यांनी स्वाक्षऱ्या करून व बिल तयार करून ठेकेदाराचे बिल अदा करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे. असा आरोप प्रा. प्रा . डी. एन. खरे यांनी केला. संबंधित ठेकेदारास रीतसर नोटीस देऊन निर्धारित वेळेत काम पूर्ण न केल्याने त्यांची लायसन्स तात्काळ काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच सदरच्या ठेकेदारास कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ कार्यादेश देण्यात येऊ नये. अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डी. एन. खरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *