
वसई: वसई-विरार महानगरपालिकेने पत्रकारांच्या घरपट्टी शुल्काची यादी व्हायरल केल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शहरातील कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांची यादीही तितकीच महत्त्वाची आहे.
वसई-विरार आणि नालासोपारा भागात वापरण्यात येणारी कचरा वाहने जुनाट आणि धोकादायक झाली आहेत. या कालबाह्य वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. तरीही, संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.
महानगरपालिकेने आता पारदर्शक कारभार करत ठेकेदारांची संपूर्ण माहिती, त्यांच्या गाड्यांची स्थिती आणि संबंधित कंत्राटे सार्वजनिक करावीत. नागरिकांना योग्य माहिती मिळाली, तर शहराचा विकास आणि सुरक्षितता दोन्ही शक्य होईल.