विरार(प्रतिनिधी)-पालघर लोकसभा मतदार संघात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरार येथे प्रचारसभा संपन्न झाली.या मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री काल विरारमध्ये आले होते.त्यावेळी स्थानिक सत्ताधारी बविआवर जोरदार टीका केली.विरार पूर्वेकडील मनवेलपाडा तलाव येथे सदर सभा आयोजित करण्यात आली होती.
ही निवडणूक गल्लीची नसून दिल्लीची आहे,मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी राजेंद्र गावित यांना निवडणूक देण्याचे आवाहन केले.यावेळी मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की काही लोकांना भुजबळांच्या खाली कोठडीत जाण्यासाठी घाई झाल्याचे सांगत हितेंद्र ठाकूर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.तुमच्या सारखी अनेक लोक लाईन लावून ऊभी आहेत,एकच कोठडी नाही आहे,पुष्कळ कोठड्या आहेत,ज्याच्या मनात कोठडीत जाण्याची इच्छा आहे त्यांना आम्ही तथास्तु म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्यात येईल असा टोला त्यांनी लगावला.रविवारी एका कार्यकर्ता मेळाव्यात ‘निवडणुका आल्या की ईडीची धमकी दाखवतात, पण ईडीला घाबरायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? मी जेलमध्ये जाऊन आलोय. भुजबळांची कोठडी खाली आहे, तिथे जाऊन राहीन. घाबरायला मी उद्धव ठाकरे नाही तर हितेंद्र ठाकूर आहे’असे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले होते. या प्रश्नाला आज मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.यावेळी मंचावर
पालकमंत्री बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, रविंद्र चव्हाण,आगरी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील,युतीचे उमेदवार राजेंद्र गावित,रवींद्र फाटक, पास्कल धनारे,श्रमजीवी चे विवेक पंडित, राजन नाईक,ज्योती ठाकरे, वसंत चव्हाण,श्रीनिवास वनगा,आरपी आयचे ईश्वर धुळे आदी मान्यवर उपस्थित होते.या सभेला भाजप, शिवसेना, आर.पी.आय, रासप,
श्रमजीवी संघटना, जन आंदोलन समिती व आगरी सेनेचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेउपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *