प्रतिनिधी : भाडे तत्वावर घर घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने बुकिंग केली. सदर व्यवहारात फसवणूक झाल्या प्रकरणी तुळींज पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, भाडे तत्वावर घर घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने के.वैभव (पत्रकार) बुकिंग केले. साई आस्था सहवास या इमारतीत घर बुक केले. शुभम गणेश मिश्रा नामक व्यक्तीने स्वतः विकासक असल्याचे सांगून हा व्यवहार केला. स्वतःच्या मालकीची सदनिका असल्याचे सांगून ६ महिन्याचे आगाऊ भाडे शुभम गणेश मिश्रा याने घेतले. त्यानंतर तो घराची चावी व कागदपत्रे देण्यासाठी चालढकल करीत आहे. शुभम गणेश मिश्रा याच्या महालक्ष्मी बिल्डर्स अँड डेवलपर्स कार्यालयात गेल्यानंतर सदर इसमाने अनेकांना फसविल्याचे निदर्शनास आले. सदर प्रकरणी पोलिसांनी दखल पात्र गुन्हा दाखल न करता अदखलपात्र गुन्हा नोंद केला. सदर प्रकरणी हवालदार विशाल सुरवडे यांनी शुभम गणेश मिश्रा याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावले असता तो पोलीस स्टेशनमध्ये गेला नाही. अदखलपात्र गुन्हा दाखल केला असल्यामुळे पोलीस काहीच करू शकत नाहीत. दखलपात्र गुन्हा दाखल केला असता तर आरोपीला अटक करता आली असती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *