
प्रतिनिधी :
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उप जिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कुळ कायदा विभागात असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. असा हा कलंकित अधिकारी सध्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात उप जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. अधिकारी वा कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडल्यावर निलंबित न करता सरळ बडतर्फ करायला हवे.
डॉ. किरण महाजन हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कुळ कायदा विभागात उप जिल्हाधिकारी असताना त्यांना व त्यांचा लिपीक राजेश रणदिवे यांना दि. १२ सप्टेंबर २०१२ रोजी लाच घेताना अटक केली होती. प्रत्येक सरकारी अधिकारी व कर्मचारी लाच घेतोच घेतो. एखाद्याचे नशीब खराब असेल तर तो पकडला जातो. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक झाल्यानंतर त्याला थेट बडतर्फ करायला हवे. सरकार भ्रष्टाचाऱ्यांच्या मागे उभे असल्याचे दिसते. भ्रष्टाचाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक झाल्यानंतर संबंधिताला निलंबित केले जाते व जास्तीत जास्त ६ महिन्यात पुन्हा सेवेत घेतले जाते. त्यामुळे निलंबनाने कोणताही फरक पडत नाही. आतापर्यंत ज्या ज्या अधिकारी वा कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली त्यापैकी किती जणांना शिक्षा झाली याचा तपशील पाहिल्यास ५ % आरोपींना ही शिक्षा झाली नसेल. भ्रष्टाचाराबाबत सरकारचे धोरण पाहिल्यानंतर सरकार भ्रष्ट अधिकारी वा कर्मचारी यांना ठोस शिक्षा व्हावी या करिता प्रयत्न करताना दिसत नाही.
उप जिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांच्या घराच्या झडतीमध्ये १ कोटी ९५ लाखांची मालमत्ता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागली होती. डॉ. किरण महाजन व लिपिक राजेश रणदिवे यांना अटक केल्यानंतर राजेश रणदिवे यांना निलंबित करण्यात आले तर डॉ. किरण महाजन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही. सदर मुद्दा विरोधी पक्षाने विधान परिषदेत उपस्थित केला होता. तेव्हा तत्कालीन गृह मंत्री आर. आर. पाटील यांनी डॉ. किरण महाजन यांना निलंबित केले जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र डॉ. किरण महाजन यांना निलंबित करण्यात आले होते की नाही, याची माहिती सध्या उपलब्ध नाही. सदर बाबत संपूर्ण माहिती उपलब्ध करून डॉ. किरण महाजन व भ्रष्ट यंत्रणेचा पर्दाफाश केला जाईल.