पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा मार्फत विधानसभा लढवलीच पाहिजे ह्यात दुमत असल्याचे कारण नाही. परंतु वस्तूस्थिती जिल्ह्यात अशी आहे. की जिल्हाच्या नेतृत्व पदावर आल्यापासून किती बांधणी केली? किती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं? किती बूथ व गटप्रमुख नेमले ह्याची स्पष्ठता जिल्हा अध्यक्षांनी केली पाहिजे. व उमेदवार ठरविण्याकरिता किती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले ? आमचे असे स्पष्ट म्हणणे आहे की, जिल्हा अध्यक्ष ह्यांच्या नेतृत्वावर अनेक आमच्या कार्यकर्त्यांची नाराजी असल्यामुळे ते इतर ठिकाणी जाण्याच्या मार्गावर आहे. असे असतांना कोणत्या आधारावर विधानसभा निवडणुकीची मांगणी अध्यक्ष करतात ? हा मोठा प्रश्न आहे. आणि पक्ष श्रेष्ठींना कदाचित चुकीची माहिती किव्ह रिपोर्टिंग देत असतील असे माझे स्पष्ट म्हणणे आहे. पक्षाकडून यदाकदाचित विधानसभा उमेदवारी देयची ठरली तर, पक्षाची मेहनत वाया जाऊ नये. ही आमची भूमिका आहे. कारण की आमचे प्रेरक व राष्ट्रीय अध्यक्ष नामदार श्री. अजित दादा व आमचे मार्गदर्शक प्रांत अध्यक्ष आदरणीय श्री. सुनील तटकरे साहेब हे कार्यकर्ते व पक्षवाढीकरिता जिवाचे रान करीत आहेत.त्याची किंमत जिल्हा नेतृत्व करीत नाही. आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते , पदाधिकारी ह्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात व ज्यांना त्यांनी प्रमुख पद दिली ते तर त्यांचीच बाजू घेणार ना ? मग आमच्यासारखे स्वाभिमानी कार्यकर्ते पक्षासाठी जे मनापासून प्रामाणिक काम करतात त्यांच्याकरिता हाच मोठा प्रश्न आहे . परंतु आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हास मान्य असणार आहे. कारण आम्ही दादा व तटकरे साहेबांच्या शब्दाबाहेर नाही. बाकीचे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही दीड महिन्यापासून समजावण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यांना जिल्हा नेतृत्व मान्य नसल्यामुळे व खरच जे चांगले कार्यकर्ते आहेत ,पक्षासाठी वेळ देणारे आहेत ते इतर पक्षात प्रवेश करीत असतील तर हे पक्षासाठी घातक ठरेल व ह्याचे नक्कीच आम्हाला वाईट वाटेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *