

नालासोपारा – वसई-विरार शहर महानगरपालीका, प्रभाग समिती ‘ई’ नालासोपारा कार्यक्षेत्रातील लक्ष्मीबेन छेडा मार्ग, जेमीनी सोसायटी येथील सर्वे नं. ३४/१, ३४/४ प्लॉट नं.९ १०,११ या भूखंडावरील पिंपळाच्या झाडाची अवैध वृक्षतोड केल्या बाबतच्या तक्रारीवरून मे. शिवानी इंटरप्रायजेचे बिल्डर हेमंत कर्णिक यांच्याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्याचे आदेश उपआयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण अधिकारी वसई विरार शहर महानगरपालिका, विरार, मुख्य कार्यालय येथून सहा.आयुक्त प्रभाग समिती ‘ई’ नालासोपारा विभाग यांना देण्यात आले. संबधीत बिल्डर वर त्वरीत गुन्हा (FIR) दाखला करावा अशी मागणी अखिल भारतीय जिवा सेनेचे अध्यक्ष गोविंद पिंपळगांवकर यांनी केली आहे. महानगरपालिकेची कुठलेही परवानगी न घेता अवैध वृक्षतोड केली आहे.