वसई : पत्रकारितेची आवड आणि सामाजिक भान याची दखल घेत ‘कामगार नेता’ या हिंदी पाक्षिकाचे संपादक अमोल गायकवाड यांनी जावेद नासिर खान यांची उपसंपादकपदी नियुक्ती केली. वसई पूर्व येथील दत्तानी मॉलमध्ये यासंदर्भातील औपचारिक बैठक पार पडली.

यावेळी युनिटी मीडिया प्रेस क्लबच्या अध्यक्षा रुबीना मुल्ला यांनी जावेद खान यांना नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र प्रदान केले. त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देताना मुल्ला म्हणाल्या, “पत्रकार समाजाचा आरसा असतो आणि आरसा नेहमी सत्य दाखवतो. सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं. निर्भीड आणि जबाबदार पत्रकारिता ही काळाची गरज आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “पत्रकार हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आपण संविधानाचे रक्षक आहोत. समाजात धर्म आणि जात या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. अशा परिस्थितीत पत्रकारांनी विशेष दक्षता घ्यावी आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी.”

जावेद नासिर खान यांना पत्रकार मंडळींनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या कार्यकुशलतेवर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *