

वसई (प्रतिनिधी)- योगाचा प्रसार प्रचार करण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य व्यक्तींचे जीवनात असलेले योगाचे महत्व योगा मुळे आरोग्य निरोगी व सुदृढ कसे राहते. याबाबत पतंजली योगपीठ हरिद्वार संचालित पतंजली योग समिती मुंबई पालघर विभाग वसई तहसील द्वारा 31 मार्च ते 30 एप्रिल 2025 पर्यंत, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र डीजी नगर ,अष्टविनायक लेन 60 फूट रोड दिवाणमान वसई पश्चिम येथे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सतीश अडसूळ व माजी नगरसेविका मीना अडसूळ उपस्थित होते. पतंजली योग समितीचे संयोजक अशोक ग्रोवर मुख्य योग शिक्षक मिलन ठक्कर, जिल्हा कमिटी नितेश मोरया ,सुनील वर्तक, शिवेंद्र मालवीय, छगन पाटील ,अजित सिंग ,तर तहसील कमिटीचे किरण शहा ,बलवंत जयंत, विनोद व्यास ,प्रसाद बावस्कर, निमाई कुमार, निलेश जैन ,नरेश भवानी ,अल्फा शहा, विजय खेतले, निर्मल आनंद ,राजू तलाठी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवशी तीस साधक होते तर वीस पतंजली समितीचे पदाधिकारी उपस्थित होते प्रसादाची व्यवस्था ज्योती हत्तरकी यांनी केली. या सहयोग योगशिक्षक प्रशिक्षण शिबिरामध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर सहभाग घ्यावा असे आवाहन पतंजली योग समिती चे राज्यसभा कार्यकारणी सदस्य शांता कुमार यांनी सर्व साधकांना आहे.
योगेश शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली मीत्यानंतर प्रार्थना घेण्यात आली. तसेच या योगशिक्षण प्रशिक्षणामध्ये देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासंदर्भात उपस्थित साधकांना माहिती देण्यात आली. पतंजलीच्या पाच संस्थांची देखील सर्वांना माहिती देण्यात आली सर्व नवीन साधकांची ओळख करण्यात आली पतंजलीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची देखील ओळख करण्यात आली. याप्रसंगी सर्वांना योग शिक्षण बाबतची पुस्तक तथा मॅट नेती पॉट. इत्यादींचे वाटप करण्यात आले.
31 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे योग प्रकार शिकवण्यात येणार आहेत यामध्ये प्रामुख्याने योगसाधना, प्राणायाम, अष्टांग योग. व्यायाम, एम नियम, योग सूत्र ,ह्यूमन ऍटॉनोमी मूद्रविद्या, जडीबुटी विद्या, ॲक्युप्रेशर ,हवन चिकित्सा, पंचकर्म ,षटकर्म घरगुती उपचार याबाबत माहिती देण्यात येणार आहे जवळजवळ एक महिना हे शिबिर राहणार आहे. या योग प्रशिक्षणातून जास्तीत जास्त सहयोगी योग शिक्षक तयार करण्याचे उद्दिष्ट पतंजली योगा समितीने ठेवले आहे.असे शांता कुमार यांनी सांगितले .आत्तापर्यंत पतंजली योग समितीने 165 योग शिक्षक तयार केलेले आहेत. सोसायटी, मंदिर, हॉल उद्यान या ठिकाणी दररोज ८० निशुल्क योगा क्लासेस पतंजली योग समिती वसई मार्फत चालवण्यात येतात. अशी माहिती पतंजली योगा समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य शांताकुमार यांनी दिली . त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवसात ज्या साधकांना योग शिक्षक बनायचे आहे त्यांनी पतंजली योग समितीसी संपर्क साधावा असे आवाहन देखील शांता कुमार यांनी केले आहे.