
पालघर दि. 23 : पालघर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी आज शनिवार दि, 23 जुलै रोजी मावळते जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्याकडून पदभार स्वीकारला.
. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांना, अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
या पूर्वी श्री.बोडके महावितरण कोकण विभागीय परिमंडळाचे सह. व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते.. तसेच त्यांनी कल्याण – डोंबिवली महानगर पालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका आयुक्त अशा विविध पदाचा त्यांना अनुभव आहे.. श्री. बोडके यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांशी कामकाजाबाबत चर्चा केली. यावेळी आपत्ती व्यसस्थापनाचा आढावा घेतला. तसेच व्हीडीओ काँफरंस हॉल व मिटींग रुमची पाहणी केली.अधिकारी वर्गाना सूचना दिल्या
. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, उपजिल्हाधिकारी संदीप पवार, उपनिवासी उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले, प्रांत अधिकारी धनाजी तोरस्कर, तहसीलदार चंद्रसेन पवार आदी अधिकारी उपस्थित होते