मिरा-भाईंदर ( घनश्याम आंबोकर): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावा Pने उभारण्यात आलेले कला दालन तात्काळ सर्वसामान्य कलाकार आणि नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रशासनाला अधिकृत पत्र देत प्रशासनाला अल्टीमेटम दिला आहे.

हिंदुहदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे कलादालन 1 नोव्हेंबर 2026 पूर्वी खुले करणेबाबत. a

हिंदुहदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे कलादालन 1 नोव्हेंबर 2026 पूर्वी खुले करणेबाबत.b

 

हिंदुहदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे कलादालन 1 नोव्हेंबर 2026 पूर्वी खुले करणेबाबत. a

 

स्थानिक कलाकारांचे नुकसान शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख राजू भोईर आणि महिला संघटक निशा नार्वेकर यांनी महापालिका आयुक्त व आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या भव्य कला दालनाचे बांधकाम पूर्ण होऊन बराच काळ लोटला आहे, परंतु अद्यापही ते सर्वसामान्यांसाठी बंदच ठेवण्यात आले आहे. परिणामी, परिसरातील उदयोन्मुख कलाकार, चित्रकार, तसेच सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळत नाहीये, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे.

१ नोव्हेंबरचा अल्टिमेटम प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि कलाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याची गंभीर दखल घेत शिवसेनेने येत्या १ नोव्हेंबरपर्यंत हे कला दालन कायदेशीर व सर्वसामान्यांच्या वापरासाठी पूर्णपणे खुले करावे, अशी ठाम मागणी केली आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत हे दालन सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *