
मीरा भाईंदर, प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या विशेष दिवसाचे औचित्य साधत, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून गरजू व निराधार महिलांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.विरोधी पक्षनेत्या तथा नगरसेविका सय्यद आफरीन मुझफ्फर हुसैन यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक आधार देण्याचा महत्त्वाचा प्रयत्न करण्यात आला आहे.यावेळी माजी उपमहापौर नूरजहाँ हुसैन (मम्मी जी) यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व आदरणीय नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसासारख्या आनंदाच्या प्रसंगी कोणताही फाफटपसारा न करता थेट समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल उपस्थितांनी आणि नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
