
रमजान महिना सुरू असल्याने मुस्लिम बांधव संध्याकाळी नमाज पठणासाठी मशिदीत येत आहेत, त्यामुळे परिसरात काही गोरगरीब फळांसह खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावत आहेत, परंतु महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून या हातगाड्यांवर कारवाई केली जात आहे, ही कारवाई तातडीने थांबवण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम बांधवांच्या वतीने पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक रफिक शेख यांनी केली आहे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांना त्यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे, इस्लाम धर्मात पवित्र रमजानला अनन्यसाधारण महत्व आहे या महिन्यात मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे (उपवास) केले जातात, रोजा बरोबरच नमाज, कुराण पठण, विशेष प्रार्थना आदींमार्फत परमेश्वराची इबादत केली जाते, त्यामुळे मशिदीबाहेरील हातगाड्यांवर कारवाई करू नये अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे, मुस्लिम बांधवांच्या विनंतीस मान देऊन आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी मशिदी बाहेरील हातगाड्यांवर कारवाई न करण्याचे आश्वासन दिल्याचे माजी नगरसेवक रफिक शेख यांनी सांगितले