


नालासोपारा (दि) वार्ताहर……… नालासोपारा पश्चिमेस असलेल्या गाव मौजे राजोडी येथील सर्वे नंबर 212 या आकार पडीत जागेवर कथीत भुमाफियां बिल्डर मार्शल मॅथ्यू रुजारियो व मिकि मार्शल रुजारियो यांनी तहसीलदार ,मंडळ अधिकारी व तलाठयांच्या कृपाशीर्वादाने कब्जा करून अनधिकृत चाळींचे बांधकाम केलेले आहे आकार पडीत जागेवर कब्जा करणाऱ्या कथीत भुमाफियांनी अनधिकृत बांधकाम करून खोल्या बांधल्या ने परिसरात चर्चांना उधाण आले असून तहसीलदार कार्यालयांचा व पालिकेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे वसई चे तहसीलदार व महसूल अधिकाऱ्यांनी शासकीय जमीन भुमाफियाच्या घशात घालण्याचा प्रकार वसई तालुक्यास नवीन नाही या पूर्वी महसूल खात्याच्या शेकडो एकर जमीनीवर भुमाफियांनी अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे केलेली आहेत मात्र त्या अनधिकृत बांधकामावर महसूल खात्याने कारवाई केलेली नसून महसूल खात्याच्या जमीन मोकळ्या केलेल्या नाहीत त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे असाच प्रकार राजोडी येथील वाडगोळी,तांडेल पाडा विभागात असलेल्या आकार पडीत जागेवर बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामां वरुन दिसून येत आहे त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे तालुक्यात वाढत असलेल्या अनधिकृत बांधकामा चा प्रश्न गंभीर होत चालला आहे शासकीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारा मुळे अनधिकृत बांधकामात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आकार पडीत जागेवरील चाळीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी वसई विरार महापालिका व महसूल खात्याकडे तक्रारी करण्यात आल्या मात्र पालिकेसह महसूल अधिकाऱ्यांनी आकार पडीत जागेवरील अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करून अनधिकृत बांधकामास प्रोत्साहन देत असल्याचे तक्रार दारांचे म्हणणे आहे पालिका व तहसीलदार आकार पडीत जागेवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास का वेळ काढत आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.