Oplus_131072

​वसई: महाराष्ट्र शासनाने एमएमआर क्षेत्रामध्ये मीटर रिक्षांच्या भाडेदरात १ रुपयाने वाढ केली आहे. या निर्णयाचे पडसाद वसई तालुक्यातील प्रवासी वाहतुकीवर उमटत असून, सर्व शेअर रिक्षा मार्गांचे नव्याने सर्वेक्षण करून सुधारित भाडेदर निश्चित करावेत, अशी ठाम मागणी पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे (RTO) केली आहे.

  • संघटनेची प्रमुख मागणी: १ सप्टेंबर २०२६ पासून लागू झालेल्या मीटर भाडेवाढीच्या पार्श्वभूमीवर वसई पूर्व, वसई पश्चिम आणि संपूर्ण तालुक्यातील सर्व शेअर रिक्षा मार्गांचे अंतर नव्याने मोजले जावे.
  • पारदर्शक व्यवस्था: प्रत्येक शेअर रिक्षा मार्गाचे भाडे वैज्ञानिक पद्धतीने ठरवून ते अधिकृतपणे रिक्षा थांबे आणि प्रमुख सार्वजनिक ठिकाणी फलकांवर लावले जावेत.
  • गैरसमजांना आळा: काही भागांत मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी असून, प्रवासी आणि चालक या दोन्ही घटकांच्या हिताचे रक्षण करणारी न्याय्य व सुटसुटीत भाडेप्रणाली लागू करावी.

​वसई तालुक्यात शेअर रिक्षा व टॅक्सीच्या माध्यमातून दैनंदिन प्रवाशांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते. मात्र, अधिकृत भाडेदरफलक आणि स्पष्ट नियमांचा अभाव असल्यामुळे अनेकदा प्रवासी व रिक्षाचालक यांच्यात वाद किंवा संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून अधिकृत भाडेदरांची घोषणा करावी आणि गैरसमजांना आळा घालावा, अशी आक्रमक भूमिका संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष विजय न. खेतले यांनी निवेदनाद्वारे घेतली आहे. प्रशासनाकडून यावर काय आणि कशी कारवाई केली जाते, याकडे वसईकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *