
वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रातील महावितरण कंपनीच्या वीज पुरवठ्याच्या ओव्हरहेड केबल भूमीगत करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांनी मा.ना. श्री. गिरीष महाजन , मंत्री , जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन , महाराष्ट्र राज्य यांची त्यांच्या सेवासदन या निवासस्थानी भेट घेतली. आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांनी भूमिगत केबलचा प्रश्न विधान मंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनातही उपस्थित केला होता. त्यावर श्री. गिरीष महाजन , मंत्री यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन आजच या प्रस्तावाला मान्यता देत असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार महोदयांनी खोलसापाडा – १ प्रकल्पाचे १००% पाणी वसई-विरार महानगर पालिकेसाठी आरक्षित करण्याच्या प्रस्तावावरही त्वरीत आणि सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती मा. मंत्री महोदयांना केली. त्यावरही लवकरच निर्णय घेण्यात येईल असे मा. मंत्री श्री. गिरिष महाजन साहेबांनी आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांना आश्वासित केले.
मा. मंत्री महोदयांनी घेतलेल्या वरील निर्णयाबद्दल आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांनी त्यांचे आभार मानले.