विरार | प्रतिनिधी

राज्यातील शालेय शिक्षणात इयत्ता पहिल्यापासून हिंदी भाषा सक्तीने लागू करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी विरार पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘मराठी भाषा हा महाराष्ट्राचा आत्मा आहे, त्यावर कोणतीही सक्ती वा दबाव चालणार नाही’ असा स्पष्ट संदेश देत सरकारच्या हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

शहरप्रमुख उदय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात शिव वाहतूक सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष आनंद (दादा) चोरघे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश राऊत, उपतालुकाप्रमुख सचिन म्हात्रे, विधानसभा संघटक सौ. संगीता राऊत, जिल्हा सचिव गिरीश दिवानजी, शहर समन्वयक प्रदीप साने, सकल मराठा समाज वसई तालुका उपखजिनदार राकेश सावंत, शिवराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष नितीन अवटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेचे कट्टर निष्ठावंत महेश दिक्षीत, शहर सचिव राहुल धुरी, महिला शहर संघटक शिलाताई लष्करे, शहर सहसमन्वयक प्रसाद मिर्लेकर, रमेश गुरव (काका), शिव आरोग्य सेनेचे रोहित देव, उपशहरप्रमुख जितेंद्र खाडे, अंजली पाटकर, शाखाप्रमुख शिवराम तळेकर, विभागप्रमुख लॉरेन्स मच्याडोअजय पिंपळे, उपविभाग संघटक सौ. जयश्री चव्हाण, शाखा संघटक सौ. सुनिता मुळे यांच्यासह शेकडो शिवसैनिक, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी आणि मराठी भाषा प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या आंदोलनात सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत “मराठीच्या मुळावर घाव सहन केला जाणार नाही!” असा इशारा देण्यात आला.

“महाराष्ट्रात शिक्षणाचा निर्णय हा स्थानिक भाषेच्या आधारेच व्हायला हवा. दिल्लीच्या दबावाखाली राज्य सरकारने घेतलेला हिंदी सक्तीचा निर्णय म्हणजे मराठी भाषेचा अपमान आहे, आणि शिवसेना अशा निर्णयाला कधीही समर्थन देणार नाही,” असा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *