
विरार
समाजसेवेचे आजीवन व्रत स्वीकारून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सक्षमीकरणाच्या उपक्रमांद्वारे सातत्याने कार्यरत असलेले अजीव यशवंत पाटील हे यंगस्टार्स ट्रस्टचे समन्वयक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन विकासाचा व्यापक दृष्टिकोन मांडणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. प्रभाग क्रमांक चारच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले, कामाशी एकनिष्ठ आणि चौफेर दृष्टिकोन असलेले अजीव यशवंत पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन विरारमधील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी चॉकलेट मेकिंग, अगरबत्ती तयार करणे यांसारख्या प्रशिक्षण उपक्रमांतून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जात आहे. यासोबतच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन तसेच यूपीएससी व एमपीएससी परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढवण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पाढे पाठांतर, घन पाठांतर, विज्ञान रांगोळी यांसारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर भर देण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीही विविध स्पर्धा व उपक्रम राबवून त्यांना सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
पडद्यामागे राहून काम करणारा, कधीही श्रेय न घेता सहकाऱ्यांना प्रोत्साहन देणारा आणि सतत कार्यकर्त्यांच्या संपर्कात असणारा नेता म्हणून अजीव यशवंत पाटील यांची ओळख आहे. कोणत्याही वेळी मदतीसाठी धावून जाणारा, सर्वांसाठी सहज उपलब्ध असणारा नेता, मित्र, सखा, दादा, भाऊ अशा अनेक नात्यांतून ते लोकांशी जोडले गेले आहेत.
यंगस्टार्स ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी तीन वेळा गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये संस्थेचे नाव नोंदवले असून, त्याचे श्रेय स्वतः न घेता लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना देण्याचा मनाचा मोठेपणाही त्यांनी दाखवून दिला आहे. रस्ते, वीज, पाणी आणि करसंकलन एवढ्यापुरतेच नगरसेवकाचे काम मर्यादित न ठेवता समाजातील सर्व थरांना एकत्र घेऊन त्यांना पुढे नेणारे नेतृत्व त्यांनी उभे केले आहे. म्हणूनच, असा समाजसेवेसाठी अविरत, आजीवन काम करणाऱ्या अजीव यशवंत पाटील यांना निवडून द्यावे, यासाठी विरारकरांनीच मोहीम हाती घेतली असून, त्यांनी तसे आवाहन केले आहे.
दोन दोन ओळीच्या प्रचारासाठी वापरता येतील, असा मजकूर
समाजसेवेचे आजीवन व्रत घेतलेला, समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करणारा आणि विकासाला नवी दिशा देणारा विश्वासार्ह नेता म्हणजे अजीव यशवंत पाटील.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी उद्योग प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांचे वर्ग, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण स्पर्धा असा समाजातील प्रत्येक घटकासाठी सातत्याने कार्य करणारे नेतृत्व म्हणजे अजीव यशवंत पाटील.
पडद्यामागे राहून काम करणारे, कधीही श्रेय न घेता कार्यकर्त्यांना पुढे आणणारे, २४ तास लोकांमध्ये असणारे, हाक मारताच धावून येणारे असे नेतृत्व. ते निव्वळ शब्दांचे नाही, तर कामाचे आहे. कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व म्हणजे अजीव यशवंत पाटील.
नगरसेवक म्हणजे केवळ रस्ते, वीज, पाणी एवढेच नव्हे; तर समाजाला एकत्र घेऊन पुढे नेणारा नेता असतो, हे अजीव यशवंत पाटील यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे.
प्रभाग क्रमांक चारचा सर्वांगीण विकास, स्वच्छ प्रशासन, सक्रिय समाजसेवा आणि विश्वासार्ह नेतृत्वासाठी
कामाशी एकनिष्ठ, चौफेर विचार करणाऱ्या अजीव यशवंत पाटील यांनाच प्रचंड बहुमताने निवडून द्या.
