
वसई।तेहसीन चिंचोलकर :
आमचे मासिक स्त्री दर्पणच्या उप संपादिका श्रीमती विभावरी देसाई यांच्या वडिलांचे, अलीकडेच काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले.
तसा विभावरी मँडमशी माझा अलिकडच्या चार पाच महिन्यातीलच परिचय झालेला. त्यामुळे तशी अधिक जवळीक नव्हती.तरीही कामाच्या निमीत्ताने झालेल्या
भेटीतु संवाद होत गेले,स्नेह जुळून आला.,
काही दिवसांपूर्वी, त्यांच्या वडिलांना दवाखान्यात अँडमिट केले आहे. व ते आयसीयूमध्ये आहेत असे कळले. मला खुप वाईट वाटले.
मॅडमकडे मी मध्यंतरी घरी गेले असताना, त्यांचा वडिलांना पाहिले होते. त्यांच्याशी बोलणे हि झाले आहे.
तसे बघावे तर ते माझ्या वडिलां सारखेच म्हणून मीही त्यांना बाबा म्हणून संबोधीतायेची.
स्त्री दर्पण प्रारंभ झाल्यापासून माझी आणि मॅडमशी गट्टी अगदी एका बहीणी सारखीच….
बाबा हॉस्पिटल मध्ये अँडमिट असताना मी वेळोवेळी विचारपूस करत होते. त्यांचे वय झाल्याने डॉक्टरानीं हवे ते प्रयत्न करून बघितले पण शेवटी…….ईश्वरी इच्छा…
मला खूप वाईट वाटले. बाबांच्या विषयी ,
मला मँडमनी सांगितले… की ते वसईतील जुने क्रिकेट पट्टू, म्हणून नावाजले जात.
एकेकाळी मुंबई क्रिकेट मध्ये सुद्धा, म्हणजे १९८०-९९ च्या दशकात डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून ते.प्रसिद्ध होते. ओरिएंटल इन्शुरन्स तर्फे बाबा बरीच वर्षे कर्णधार भूषण टाइम्स शील्ड सारख्या नामांकित क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळताना त्यांचा उत्कृष्ट खेळ रसिकांनी अनुभवला आहे.
आज सर्वच क्षेत्राबरोबर क्रिकेट मध्ये हि अमुलाग्र बदल झाला आहे. तथापि त्या काळातील बाबांच्या खेळातील नैपुण्य, त्यांच्या नावाला एक वेगळेच वलय प्राप्त करून देणारे असे
आज बाबांनी जगाचा निरोप घेतला असला तरी आठवणीच्या रुपाने ते आज सुद्धा ते आमच्या जवळपास आहेत,
लव्ह यू बाबा. आमचा स्नेह सदैव आपल्याशी राहो …
खूप प्रेम करतो. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन…