
नायगाव (प्रतिनिधी ) स्नेहा जावळे आज एक समाजसेविका, टॅरो कार्ड रीडर, हस्ताक्षर रीडर, रेकी ग्रँडमास्टर, लेखिका, थिएटर कलाकार अशी इंटरनॅशनल ओळख आहे . पण त्यांच्या चेहऱ्यावरचा इतिहास त्यांच्या भूतकाळात जायला भाग पाडतो . त्या हुंडाबळी पिढीत आहेत. ज्यांना सासरच्या व्यक्तींनी हुंड्याची वारंवार मागणी करत होते काही मागण्या पूर्णही केल्या पण नंतर हुंडा देण्यास नकार दिला असताना त्यांना रॉकेल टाकून पेटवून देण्यात आलं होतं .
या प्रसंगातून त्या उभ्या राहून त्यांनी स्वतःची ओळख बनवली .
” माझ्या चेहऱ्याने माझी ओळख का सांगावी माझं काम माझी ओळख देत”
अशा विचारांच्या स्नेहा जावळे सौंदर्य कमी झालं असतानाही स्वतःला मनापासून सुंदर मानतात त्यांच्या ओळखीतली लोक सांगतात त्यांचं काम सुंदर आहे त्यांचं ज्ञान सुंदर आहे म्हणून आमच्यासाठी स्नेहाची सुंदर आहेत.
2012 मध्ये दिल्लीमध्ये जी निर्भया बलात्काराची घटना घडली त्यावर आधारित निर्भया नावाच्या नाटकात स्नेहांनी स्वतःची घटना गोष्ट त्या नाटकात आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडली होती.
स्नेहा जावळे ना त्यांच्या कामासाठी समाजकार्यासाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत . चार कर्मवीर चक्र फ्रान्स आणि कर्मवीर चक्र सिल्वर यांच्यासह आंतरराष्ट्रीय ही पुरस्कार त्यांच्याकडे आहेत.
निर्भया नाटकासाठी त्यांना फेस ऑफ न्यूयॉर्क टाईम, मध्येही स्थान मिळालं होतं.
अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या स्नेहा जावळे यांना यांच्या कामामुळे आज बीबीसी बातमी कडून 100 आंतरराष्ट्रीय कर्तृत्वान महिलांच्या 2022 च्या यादीत नामांकन मिळाले आहे . त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
या यादीमध्ये प्रियंका चोपडा, गीतांजली श्री, आणि स्नेहा जावळे यांची नावं भारतातून देण्यात आली आहेत.
आम्ही मनापासून स्नेहा जावळीच्या कार्याचं कौतुक करतो, आणि भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो .