
वसई (प्रतिनिधी) – दिनांक १२ मार्च २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या यांच्या जयंती दिनी कामगार नेते रमेश भारती यांनी स्व. मा.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मूर्तीना प्रथम अभिवादन करून राष्ट्रीय नेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट त्यांच्या कार्यालयात घेण्यात आली भेटी दरम्यान पवार साहेबाना राष्ट्रवादी कामगार युनियच्या वतीने पवार साहेबांची प्रतिमा म्हणून भेट देण्यात आली त्यांनतर, वसई तालुका मधील विविध प्रश्नावर चर्चा झाली तसेच कामगारांसमोर येणाऱ्या अडचणीवर अनेक प्रश्न पवार साहेबापुढे मांडले आणि राष्ट्रवादी कामगार युनियन अत्यंत उत्तम प्रतीचे काम करत आहे अशी कौतुकाची थाप देण्यात आली आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी होकार दर्शिविला आहे, तसेच वसई-विरार च्या राजकीय वाटचालीवर लवकरच निर्णय घेणार आहे अशी प्रतिक्रिया रमेश भारती यांना देण्यात आली, तसेच रमेश भारती यांच्या सोबत युवाशक्ती एक्सप्रेसचे संपादक तुषार गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस हरेश कोटकर राष्ट्रवादी कामगार युनियचे पदाधिकारी सुरज कुमार गौड, राहुल सिंह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.