
( नालासोपारा ) – वसई विरार शहर महानगरपालिके मध्ये असलेल्या प्रभाग समिती-ई अंतर्गत येणाऱ्या नालासोपारा पश्चिम येथील लक्ष्मी बेन छेडा मार्गवरील जेमिनी बिल्डींगच्या बाजूला असलेले लोढा पार्क येथील सार्वजनिक गार्डन वर शिवानी इंटरप्रायजेसचे बिल्डर हेमंत कर्णीक यांनी अनधिकृत बांधकाम केले होते. सदर बांधकाम तोडून टाकण्यासाठी अखिल भारतीय जिवा सेनेच्या वतीने स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट २०२४ रोजी लाक्षणीक उपोषणाचा इशारा पालिका प्रशासनाला दिला होता. बिल्डरने सार्वजनिक गार्डनवर जे बांधकाम केले होते त्यावर महानगरपालीकने अर्धवट तोडक कारवाई केली. महानगरपालीने संपूर्ण अनधिकृत बांधकाम तोडून टाकावे व बिल्डर्सवर एम. आर.टी. पी अंतर्गत कारवाई करावी अन्यथा अखिल भारतीय जिवा सेनेच्या वतीने पुन्हा लाक्षणीक उपोषण करण्याचा इशारा गोविंद पिंपळगांवकर यांनी दिला आहे.


