
- आगाशी शाखेतील प्रकार.
वसई :
वसईतल्या अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या वसई विकास सहकारी बँकेच्या आगाशी शाखेमधील आपल्याच खात्यातील रक्कम काढण्यासाठी खाते धारकाला बँक कर्मचाऱ्यांकडून अरेरावी करीत रक्कम देण्यास नकार दिल्याने याबाबत खातेधारकाने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मनसे उपाध्यक्ष प्रशांत धोंडे यांनी तक्रार दिली आहे.
अधिक माहितीनुसार, सदर बँकेच्या आगाशी शाखेमध्ये खातेधारकानी काही रक्कम काढण्यासाठी धनादेश दिला परंतु , बँक नियमानुसार आगाऊ सूचना न मिळाल्याने याबाबत रक्कम देण्यास मॅनेजर विपुला पाटील यांनी नकार दिला. एकूण रक्कमे पैकी तात्पुरती रक्कम देण्यासही व्यवस्थापनाने नकार दिल्याने याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आलेले आहे.
सदर तक्रारी निवेदनानुसार
स्थानिकांना वेगळे नियम लावले जात आहेत तर परप्रांतियांना सोईस्कर नियम लावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिझर्व बँकेच्या नियमावलीचे उल्लंघन करून व्यवहार केले जात असताना आपलेच पैसे आपल्याला देण्यास बँक व्यवस्थापन नकार देत असेल तर अशा स्थानिक बँकांमध्ये खाते ठेवून काय फायदा? असा सवाल तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे धनादेश डिपॉजिट करून घेण्यासही बॅंक व्यवस्थापनाने असमर्थता दर्शवल्याने ग्राहकानी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत बँकेचे सीईओ दिलीप ठाकूर यांना विचारणा केली असता, संबंधितांची तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार आगाशी ब्रांच मॅनेजर यांना विचारणा करून योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती दिली.