
प्राप्त सूत्रांच्या माहिती नुसार
विरार मधील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना व शिव विधी व न्याय सेनेचे (उबाठा) चे पदाधिकारी असणारे ऍड गिरीश दिवाणजी यांनी वसई विधानसभा १३३, नालासोपारा विधान सभा १३२, बोईसर विधान सभा१३१ मतदार संघातील बहुजन विकास आघाडी उमेदवार श्री. हितेंद्र ठाकूर, श्री. क्षितिज ठाकूर, श्री. राजेश पाटील ह्यांच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा तसेच नामनिर्देशित फॉर्म मधील शिट्टी हे चिन्ह गोठवण्यात यावे म्हणून, मा. मुख्यनिवडणुक अधिकारी, निवडणूक आयोग,भारत सरकार यांच्या कडे तक्रार दाखल केली असून, भारत निवडणूक आयोग ह्यांच्या माध्यमातून सन २०२४ मध्ये महाराष्ट्र, झारखंड व हरियाणा राज्यांची विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली.त्याच वेळी मान्यता प्राप्त पक्षा प्रमाणे मान्यता नसलेल्या काही पक्षांच्या उमेदवारांना त्या राज्यात निवडणूक समान चिन्हावर लढविण्या करिता त्यांच्या मागणी पत्रा प्रमाणे निवडणूक आयोग कार्यालय ने Allotment of common symbol under para 10-B of the election symbol (Reservation and Allotment)order, 1968 च्या तरतुदी नुसार 14 ऑगस्त 2024 ला आपल्या पत्रा द्वारे वंचीत बहुजन आघाडी – गॅस सिलिंडर,
प्रहार जन शक्ती – बॅट,
जातीय जन सेना – कॉली फ्लॉवर
ह्या निशाणी मंजूर केल्या असताना शिट्टी ही निशाणी कोणत्याही अमान्यता पक्षाला राखून ठेवलेली,किंवा कोणत्याही अमान्यता पक्षाला मंजूर झालेली नसताना पालघर जिल्यातील वसई ,नालासोपारा,बोईसर विधानसभा मतदार संघात बहुजन विकास आघाडी पक्षाने आपल्या उमेदवारी अर्ज भरते वेळी प्रचार आणि रैली मध्ये वापर करत लोकांमध्ये शिट्टी ही बविआ ची आहे असा प्रचार करत शिट्टी इतर कोणत्या उमेदवाराला भेटू शकत नाही असा भास निर्माण करत मतदार आणि संभाव्य इतर उमेदवार यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयोग करून अचारसंहिता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे अशी तक्रार ऍड.गिरीश दिवाणजी यांनी भारत निवडणूक आयोग यांच्या कडे केली आहे.
आता निवडणूक आयोग यांच्या भूमिकेवर पालघर जिल्हातील ही निवडणूक रंजक होणार की बविआ ने नियम बाह्य अधिकार दाखवलेली शिट्टी वाजणार हे बघणे आता उत्सुकता निर्माण करणारे ठरणार आहे.

