



आज दिवाळी सणानिमित्त महाविकास आघाडी व काँग्रेसचे १३२- नालासोपारा विधानसभाक्षेत्राचे उमेदवार श्री. संदीप पांडे यांनी नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या घरी जावून भेटीगाठी घेत आपल्या प्रचाराला सुरवात केली. सदर भेटीत ते काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री. विकास वर्तक, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव श्री. दिनेश कांबळे,आंबेडकरी चळवळीतील नेते व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश राऊत व शिवसेनेचे जिल्हा सहसचिव ऍड. गिरीश दिवाणजी, काँग्रेसचे पदाधिकारी श्री. सतीश कांबळे व परेरा संकुलचे पदाधिकारी यांच्याशी मनोमिलन चर्चा केली. सदर भेटीवेळी श्री. संदीप पांडे यांचे सर्व मान्यवरांनी मनापासून स्वागत करीत त्यांना आपला जाहीर पाठींबा घोषित केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे विरार ब्लॉक अध्यक्ष श्री. नितीन उबाळे तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य व वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष श्री. आनंद चौबे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.