

अक्रम नामक इसमाला सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या कार्यालयात बेदम मारहाण केल्याचे खात्रीशीर वृत्त हाती आले असून मुबारक फिदाहुसेन चौहान याने शेषराव कालुराम राठोड याच्याशी केलेल्या व्यवहारात फसवणूक झाल्यामुळे मुबारक फिदाहुसेन चौहान याने शेषराव कालुराम राठोड याच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. सदर प्रकरणात सहाय्यक पोलीस आयुक्तांचा कोणताही संबंध नसताना मुबारक फिदाहुसेन चौहान याच्याशी आर्थिक व्यवहार करून सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांनी भूखंड धारक रोहिदास बाळू जाधव, संजय बाळू जाधव, राजू बाळू जाधव व इमारतीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहणाऱ्या अक्रम यांना फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम ४१ (अ)(१) प्रमाणे नोटीस दिली आहे. सदर पैकी अक्रम याला आज सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय विरार येथे बोलावून स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांनी मुबारक फिदाहुसेन चौहान याच्या समोरच बेदम मारहाण केली आहे.
दरम्यान बजरंग देसाई यांच्या नोटीस विरुद्ध जाधव बंधूंनी मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधितांकडे तक्रारी अर्ज केले आहेत.