


भारताचे संविधान हा भारताचा राष्ट्रीय ग्रंथ असून या देशाचा कारभार राज्यघटनेप्रमाणे चालतो. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात विविध जाती, धर्म, पंथ, वंश, भाषा, संस्कृती व श्रध्दा-विश्वास इत्यादी बाबतीत विविधता असून या विविधतेत एकता निर्माण करण्यात व भारताची अखंडता टिकवून ठेवण्यात तसेच तिचे संवर्धन करण्यात भारतीय संविधानाची महत्वपुर्ण भूमिका आहे. अशा भारतीय संविधानाचे संवर्धन होणे आवश्यक असताना काही राष्ट्रद्रोही शक्ती भारतीय संविधानाचा अवमान करून समाजात तेढ निर्माण करीत आहेत. परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्याची घटना मंगळवार दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी घडली. त्याचे पडसाद परभणीसह देशभरात उमटत आहेत. भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या समाज कंटकांवर व संविधान अवमान प्रसंगी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात सहभागी झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद झालेल्या मृत्यूची योग्य चौकशी करून दोषी असलेल्या पोलिसांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारचे निवेदन मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना वसईचे तहसीलदार मा. अविनाश कोष्टी यांच्या द्वारे देण्यात आले. या वेळी भारतीय संविधान अमृत महोत्सव समितीचे समन्वयक मा. दत्तात्रेय धुळे, मा. समीर वर्तक, प्रा. सुरेश गोतपागर, प्रकाश कांबळे, जितेंद्र सत्पाळकर, कुमार राऊत, अल्ताप मो.हुसेन, संदेश घोलप, अतुल मोटघरे, ऍड. गिरीश दिवाणजी, जॉन परेरा, फारुख मुल्ला, मनोज करमनकर, बाळाराम साळवी, चिंतामन जाधव, अशोक भाटे, निलेश मात्रे, गणेश घायवट. प्रफुल इगवे, डॉ. अंबालकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.