विरार (प्रतिनिधी)दिनांक २२ डिसेंबर २०२४ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाद्वारे प्राप्त अधिकाराने संसदेत पोहचलेल्या तडीपार अमित शाह आणि कं.ला आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची भीती वाटु लागलेली आहे त्यातुनच वैफल्यग्रस्त होऊन संसदेत विरोधी पक्षाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्यास मज्जाव करीत त्यांच्या नावाचा अवमान करण्यात आला.मुळात यातुन अमित शाह यांची मनूवृत्ती विचारसरणी दिसून आलेली आहे. परंतु भारत म्हणजे इंडिया हा देश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावरच चालतो हे पुन्हा अधोरेखित करण्यासाठी विरार येथे संविधानप्रेमीनागरिकांद्वारे अमित शहा यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत जनआक्रोश मार्च काढण्यात आला. असे ऍड गिरीश दिवाणजी यांनी सांगितले आहे.सदर आंदोलनात सर्व पक्ष व संघटनेचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. तसेच सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम ऍड. कीर्तीराज लोखंडे, लवेश लोखंडे, मनोज रुके विशाल खैरे, मंगेश वाघमारे,दीपेश येलवे, महेश राऊत, संतोष धुळे , एकनाथ निकम, मिलिंद जाधव, सुशील जाधव व इतर यांनी घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *