नालासोपारा (प्रतिनिधी):दि.२९डिसेंबर२०२४ रोजी नालासोपारा पूर्व बालाजी ओपन हॉल येथे 7 स्टार टीव्ही न्युज (डिजिटल मीडिया)पत्रकार सन्मान सोहळा व दिनदर्शिका २०२५ चे सोहळा मुख्य अतिथी आणि विशेष पाहुणे आणि पत्रकार मंडळी सोबत यशस्वी रित्या पार पाडले या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून मा. रुपेश जाधव (माजी महापौर),मा. उमेश नाईक (माजी उप महापौर),मा.मुझफ्फर घंसार जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, सामाजिक कार्यकर्ते-अहमद शेख अध्यक्ष, अहमद युसूफ मेमन, इस्माईल खान, रशीद शेख, रफिक अन्सारी, बशीर शेख, राधे श्याम, नूर खान, उमेश जामसांडेकर, राघवेंद्र मिश्रा, हसनैन अन्सारी आदीना सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांना आदर देण्यात आले या कार्यक्रम मध्ये करमणूक साठी विविध कलाकार यांनी उपस्थिती लावण्यात आले त्या मध्ये विशेष संचिन तेंडुलकर लूक लाईक बलवीर सिंग, कॉमेडी कलाकार नांना पाटेकर- तीर्थानणंद राव, झाकीर खान- कलाकार गायक,मॉडल कलाकार सोनाली, गायिका उर्वशी उपाध्याय यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले गेले आहे या समारंभात NDTV चे प्रतिनिधी मनोज सातवी, जय महाराष्ट्र न्युज -जयराज राजीवडे, न्युज-18 लोकमत पुढारी न्युज विपुल पाटील टॉप १० महाराष्ट्र न्युज दीपक कोटेकर फैक्त रिपोर्टर खुर्शीद खान, प्रभात समाचार भालचंद्र होलम, पारस न्युज टाइम्स माधुरी गोवळकर वसई फास्ट मोहन पाटील प्रवक्ता न्युज कीर्ती केसरकर मेट्रो सिटी समाचार संजय मिश्रा PTV-9 न्युज सलीम शेख, यशो मनी लालप्रताप सिंह, थिनिकग ऑफ युथ अजय वर्मा, क्राईम संध्या -लक्ष्मण पाटोळे,क्राईम रिपोर्टर टीव्ही न्युज राज शर्मा इन्कलाब न्युज फारूक शाह अँटी करप्शन न्युज सचिन दीक्षित, 7स्टार टीव्ही न्युज रामजी त्रिपाठी दै. आमची मुंबई अरुण सिंह सेफ न्युज युसूफ खान तहलका न्युज वसीम शेख पिविपी न्युज राकेश तिवारी,हिंद सागर वेद प्रकाश तिवारी ओके न्युज रवी पंडित मुंबई मित्र भंवर चौहान हं न्युज पप्पू खान वसई वैभव हरेश मोहिते, नजमा खान महिला आघाडी नालासोपारा शहर संघटक शिवसेना निर्भीड पत्रकारिता करणारे महिला पत्रकार मिरर ट्रुथ शिवानी दुबे, स्त्री दर्पण संपादिका /ज्युपिटर पब्लिकेशन (MD) – तहेसीन चिंचोलकर, पत्रकार अनु पांडे या सर्व पत्रकार मंडळींना सन्मान चिन्ह देऊन त्यांना त्यांना प्रोत्साहन केले.
तत्पूर्वी कार्यक्रम च्या सुरवातीला प्रथमतः दीप प्रज्वलन चा कार्यक्रम झाला, प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करण्यात आले त्या नंतर 7स्टार टीव्ही न्युज चे दिनदर्शिका चे प्रकाशन करण्यात करण्यात आले, आणि मंचावर उपस्थित असलेले मान्यवर आणि आपले विचार थोडक्यात मांडले काही कलाकार मंडळी यांनी आपली कला सादर केले त्यामुळे या कार्यक्रम मध्ये करमणूकीचे रंगत वाढली, ज्युपिटर पब्लिकेशन चे एम डी तहेसीन चिंचोलकर यांनी, 7स्टार न्युज टीव्ही चे संपादक मो. ताहीर माहिगीर यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांनी हा कार्यक्रम छान पद्धतीने आयोजन केल्याबद्दल त्यांचे आणि त्यांचे टीमचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *